महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार पर्यंत अनुदान योजना राबवली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळाले जाते. या योजनेत लाभ मिळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची नावे बँकेकडून मागवली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा पाठवण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांची लिस्ट सरकारने जाहीर केली असून, आतापर्यंत ४ याद्या जाहीर केल्या आहेत.
५० हजार अनुदानाच्या ५व्या यादीच्या प्रतीक्षेत आपण असाल तर सरकारने ५ वी यादी बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी जाहीर केलेली असून आपले नाव त्यामध्ये समाविष्ट आहे का हे खालील लिस्ट जिल्ह्याप्रमाणे डाउनलोड करून पाहू शकता.
याद्या कश्या पाहाव्यात ?
आपण शेतकरी आहात, आणि आपल्याला ५० हजार अनुदान यादी पाहायची आहे. आपले नाव त्यामध्ये समाविष्ट आहे का ते कसे पाहायचे पहा. आपल्याला आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र , csc केंद्र , ग्रामपंचायत ठिकाणी जाऊन या याद्या पाहू शकता. यादीमध्ये नाव असल्यास काय करावे हे खालीलप्रमाणे माहिती दिली आहे.
५वी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादीमध्ये नाव असेल तर पैसे कसे मिळवाल
१. आपले प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी खालील प्रसिद्ध केलेल्या यादीमधील शेतकऱ्यानी पुढील कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र / बैंक शाखा मध्ये जावून प्रमाणीकरण करुन घ्यावे.
- आधार कार्ड
- कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक
- यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक (स्वतः लिहून न्यावा)
२. काही विसंगती असल्यास पोर्टलवर असहमतीचे बटण दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकतो.
३. उपरोक्त कर्जखात्यांची यादी अंतिम नसून, बँकांकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्जखात्यांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
karjmafi list download maharashtra
ऑनलाईन अर्ज कसा करावा
मित्रहो आपण शेतकरी आहेत आणि आपले नाव ५० हजार अनुदान यादीत नाव समाविष्ट असेल तर अर्ज कसा आणि कोठे करावा.
आपल्याला अर्ज करण्यासाठी आपले आधार कार्ड,कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक , विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, csc केंद्र याठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी आपला आधारशी मोबाईल क्रमांक आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे.
आपण खालील व्हिडीओ पाहून अधिक माहिती घेऊ शकता