PM KISAN 14th installment new date fix

PM KISAN योजना या योजनेच्या १४व्या हप्त्यासाठी आपण सर्वजण वाट पाहत होतो. या हप्त्यासाठी भरपूर दिवस झाले असून आपल्याला हा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत आपण आहोत. त्यात आपल्याला PM KISAN हप्ता २८ जुलै रोजी येणार अशी माहिती मिळाली होती पण यात बदल करून नवीन तारीख देण्यात आलेली आहे.

आपल्याला प्रधानमंत्री शेतकरी योजनेतून वर्षाला ६ हजार अनुदान मिळते . या योजनेसाठी वर्षाला तीन हप्ते येतात तर २०२३-२४ सालामधील हा पहिलाच हप्ता आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण २६००० रुपयांचे अनुदान खात्यावर जमा झाले आहेत.

१४ वा हप्ता नक्की कधी येणार ?

आपल्याला १४ वा हप्ता हा २७ जुलै २०२३ रोजी मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. यापूर्वी हि तारीख २८ जुलै देण्यात आलेली होती पण या तारखेत बदल करून आता एक दिवस अगोदर २७ जुलै करण्यात आलेली आहेत.

कोण होणार नक्की पात्र ?

  • १) ज्या शेतकऱ्याचे PMKISAN योजनेत EKYC पूर्ण झाली आहे .
  • २) ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केले आहे.
  • ३) आपल्या जमिनीची सीडींग केली आहे . अशा शेतकऱ्यांना १४ वा हप्ता येणार आहे.

आणि वरील बाबी जर आपल्या पूर्ण नसतील तर तुम्हाला १४व्या हप्त्यापासून वंचित राहता येणार आहे.

पात्र आहे का ? हे कसे चेक करायचे

  • आपल्याला पीएम किसानच्या वेबसाईट वर जावे लागेल
  • त्यानंतर आपल्याला Know your status या ऑपशन ला सिलेक्ट करते लागेल.
  • यामध्ये आपल्याला आपला Registration No. टाकावा लागेल.
  • यामध्ये आता आपल्याला आपली सर्व माहिती ओपन होईल.

आपली सर्व माहिती ओपन झाल्यानांत आपण चेक करायचे आहे. कि आपल्या पात्र होण्यासाठी सर्व बाबी बरोबर आहेत का?

आपल्या जर वरील ३ बाबी पूर्ण असतील तर बरोबर yes असे दिसेल जर no असेल तर आपण अपात्र असाल.

अश्या प्रकारे आपण आपल्याला १४ वा हप्ता मिळणार कि नाही हे चेक करायचे आहे. आजच्या लेखात आपल्याला समजले कि १४ वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर २७ जुलै रोजी येणार आहे हे.

खाली दिलेल्या लिंक जाऊन अधिकची माहिती मिळवू शकता.

PM KISAN

Leave a comment