नमस्कार मित्रहो आज सर्वसामान्य लोकांच्या तोंडात फक्त एकच विषय आहे कि कोण निवडणूक लढवणार आणि कोण जिंकणार पण या निवडणूकीमध्ये जिंकणारा जिंकून जाईल व तो परत पाच वर्षे तुमच्यापर्यंत येणार नाही किवा तो तुम्हांला भेटणार सुद्धा नाही.
मित्रानो आजचा विषय हा त्यापेक्षा खूपच मोठा व महत्वाचा आहे. तो म्हणजे काजू बी च्या दराबद्दल (Kaju Rate) मित्रानो चंदगड, आजरा व गडहिग्लज या तालुक्यातील लोकांना वरदान मिळाले आहे ते म्हणजे काजू पीक पण त्याबद्दल खूपच कमी लोक बोलतात. बघायला गेल तर ४ – ५ वर्षापूर्वी काजूचा दर जवळपास १६० ते १७० च्या दरम्यान होता.
पण आता बघायला गेल तर तो फक्त ८५ – ९५ च्या दरम्यान आहे. मित्रानो आपल्याला राजकारणात काय चालू आहे याबद्दल खूप कौतुक वाटत, पण जी शेतकऱ्यांची रोजी – रोटी आहे त्याबद्दल खूपच कमी लोक बोलतात पाहायला गेला तर आजच्या या परिस्थितीला दुसर तिसर कोणीही जबाबदार नसून तर तो स्वतः शेतकरीच जबाबदार आहे.
सध्या पाहायला गेले तर काजू काढण्यापासून ते बाजारामध्ये विक्री करी पर्यंत जे कष्ट लागतात ते फक्त शेतकऱ्यांनाच माहिती आहे. त्यात काजू बेधणे, पाला पाचोळा लोटणे असुद्या की त्या काजू भर ऊनामधून जाऊन आणणे असुद्या आणि जर या कष्टाला जर ८५ – ९५ (Kaju Rate) दर मिळत असेल तर त्यापेक्षा दुसर दुर्देव शेतकरयांच असणार नाही. काही शेतकऱ्यांनी जर काजू कारखानदाराना विचारले तर ते सांगतात कि काजू या देशातून येते त्या देशातून येते, तुमची काजू आम्हाला परवडत नाही त्या पेक्षा ती काजू आम्हाला स्वस्त मिळते, पण यात किती सत्य आहे हे त्यांनाच माहिती व त्यांचा एकजुटीला माहिती. बघायला गेला तर पावसाळ्यामध्ये जी खराब काजू सापडते ती काजू सुद्धा हे व्यापारी सोडत नाहीत. अशीच जर परिस्थिती चालू राहिली तर हे काजू व्यापारी काजूचा दर ५० – ६० रुपयाला आणायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. पण आपण जर काजू गराच्या बाबतीत बगायला गेलो तर त्याचा दर वाढतच चालला आहे.

मित्रानो कालच मी पेपरमध्ये असे वाचले की, सिंधुदुर्ग जिल्यातसुद्धा हीच परिस्थिती होती. पण तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलने, बेंठक्या चर्चा करून तो दर आता जवळपास १३० घरात पोहचवला आहे. तेथील जर पुढारी, नेते मंडली जर तेथील शेतकऱ्यांचा जर विचार करत असतील या भागातील नेते काय फक्त मत मागायला येणार आहेत का ?
मला येच काजू उत्पादक शेतकऱ्यांना सांगायचे आहे की, आपल्याला ज्या पक्षातील नेते, पुढारी काजू दर वाढवून देत असतील तर त्यांचा विचार करण्यास हरकत नाही. आणि जर कोणत्याच पक्ष सक्षम नसेल तर आपणही मतदानावर बहिष्कार टाकणे हे आपले कर्तव्य आहे?
चंदगड आजरा तालुक्यातील शेतकरी हा काजू या पिकावर पूर्णपणे अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांची इतकी दयनीय परिस्थिती आहे की, १ किलो २ किलो काजू बाजारामध्ये विकल्याशिवाय त्यांचे घर चालत नाही कदाचित याच परिस्थिती फायदा ये लोक घेत असावे?

मित्रानो वेळ आली आहे जागे होणाची या निवडणुकीच्याआदी आपल्याला ठोस पावले उचलणे आहे. जो नेता आपल्यासाठी काम करेल त्याला मत नाहीतर यावेळी मतदानावर बहिष्कार टाकलेला बरा?
मी पण तुमच्या सारखा एक काजू उत्पादक शेतकरी आहे तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा मेसेज सर्व शेतकऱ्यांपर्यंत व त्यांचा मुलापर्यंत पोचाहावा आता शेतकऱ्यांच्या मुलांची तितकी जबाबदारी आहे कदाचित ते आपल्या अडाणी आई बाबांचा फायदा घेत असतील. आपल्या गावात कोणताही नेता येहुद्या त्यांना काजू दराबद्दल प्रश्न नक्की विचारा मित्रानो आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजे.