आपल्या सर्वाना माहिती असेल कि, महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्याला ओळकला जातो. राज्यात काही तरी नवीन सुधारणा असुदे किंवा कोणत्याही आंदोलनाची दिशा ठरवायची असुदे तिची सुरवात हि कोल्हापूर पासूनच होते. Kolhapur election result
कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा पश्चिम महाराष्ट्रातील तसे महाराष्ट्रातील महत्वाचा मतदार संघ आहे. २०२४ लोकसभा ही जागा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. कारण या जागेवर कॉंग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज व ( शिंदे ) गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यात थेट लढत झाली.
पण असे म्हणतात ना, कोल्हापूरचा विषय जरा वेगळा आहे. येते निवडणूक कोणामध्येही असुदे पण ही लढत थेट सतेज पाटील विरूद्ध धनंजय महाडिक याच्यामध्ये असते. त्यामुळे दोघांच्या प्रतिष्ठेची ही लढत आहे असे लोक मानतात.
कोल्हापूर मतदार संघात या वर्षी ७१.६० टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूरचे मतदान हे तिसरया टप्यात पार पडले. आणि तिसर्या टप्यातील सर्वात जास्त मतदान हे कोल्हापूर मध्येच झालं.

२०२४ च्या निवडणुकीत झालेले मतदान :-
एकूण मतदान – १९ लाख ३६ हजार ४०३
पुरुष मतदान – ९ लाख ८४ हजार ७३६
स्त्री मतदार – ९ लाख ५१ हजार ५७८
तृतीयपंथी मतदार – ९१
कोल्हापूर विधानसभा मतदार संघ एकूण सहा आहेत. त्यामध्ये चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, आणि राधानगरी. तर कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसचे २ आमदार आहेत तर, अजित पवार गटाचे २ आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गट यांचा १ आमदार आहेत.
अस बोललं जात आहे कि, यंदाची लोकसभा निवडणूक हि लोकांनी आपल्या हातात घेतली. कारण कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती हे स्वतः उमेदवार होते. कोल्हापूर जिल्यावर राजश्री शाहू महाराज यांचे खूप मोठ्या प्रमाणावर ऋण आहे यात काही शंका नाही. त्यामुळे यावेळी लोक खूप मोठ्या प्रमाणवर मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत असे जाणकार लोक सांगतात. आणि मतदानाच्या बाबतीत असेही बोलले जाते कि, जर आपल्याला बदल घडून आणायचा असेल तर लोक मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात.
कोल्हापूरचे मतदान हे ७ मे २०२४ रोजी पार पडले. या निवडणुकीचा निकाल हा 4 जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. पण तत्पृवी निवडणुकीचा कल कोणाच्या बाजूने लागणार आहे त्याचा कल news channel (exit poll ) वरती बाहेर येत आहे.
त्या (exit poll ) नुसार शाहू महाराज छत्रपति हे आघाडीवर असल्याच दिसून येत आहे. आणि संजय मंडलिक यांना पराभवाचा धक्का बसू शकतो असे (exit poll ) नुसार कळते.