होय मित्रानो, आज आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पाहतो तर आपल्याला padit shetjamin पडीत शेतजमिनीचे वाढते प्रमाण पाहायला मिळते. पाठीमागच्या काही वर्षापाठीमागे पडीत जमिनेचे इतके प्रमाण नव्हते. मग आता काय झाले कि padit shetjamin प्रमाण वाढत आहे.
१. खताच्या वाढत्या किमंती :-
आपल्याला सर्वाना माहित आहे की, खताचा योग्य वापर केल्याशिवाय पिकाची वाढ होत नाही. पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खताचा वापर करणे खूप गरजेचे आहे. पण आजकाल खताच्या किमंती गगनाला भिडल्या आहेत. ४ – ५ वर्षापूर्वी खताच्या एका पिशवीचा दर हा साधारणत: ४५० ते ६०० च्या दरम्यान होता, तर त्याच एका पिशवीचा दर आता साधारणत: १२५० ते १३०० च्या दरम्यान पोहचला आहे. हे महत्वाचे कारण आपल्याला दिसून येते.

२. जंगली जनावरांचा वाढता वावर :-
आपल्याला तर माहितच आहे शेती करताना आपल्याला जंगली जनावरांना सामोरे जावे लागत असते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकामध्ये जंगली जनावरे येऊन धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी शेतकारांच्या उत्पानांत घट होत आहे.

3. पिकांना मिळणारा हमी भाव :-
शेतकरांच्या पिकाला मिळणारा हमी भाव हा अत्यल्प आहे. याउलट पीक उत्पादन करण्यासाठी जास्त खर्च होत आहे. मजुरी, वाहतूक, खताचे वाढते दर, पेट्रोल व डीजेलचे वाढते प्रमाण. याचा संपूर्ण परिणाम पडीत शेतजमिनीवर पडत आहे.
4. शेतकऱ्यांना मिळणारे अल्प सरकारी प्रोस्ताहन :-
शेतीपासून उत्त्पन्न हे कमी मिळते आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत असते. पीक विमा असुद्या किसान अन्य कोणत्याही योजना. सरकारने आणलेल्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे हताश झालेले शेतमजूर थेट शहराची वाट धरत आहेत त्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतजमीन पड राहण्यावर होत आहेत.
5. वाढती बेरोजगारी :-
शेतकऱ्यांना मिळणारे उत्पादन हे खूप कमी प्रमाणात आहे. त्या उत्पादनावर त्यांचे घर चालणे हे असह्य आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात लोक घराबाहेर जात आहेत. शेतकरी आपली मुले नोकरीच्त्याया शोधात पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी पाठवत आहेत त्यामुळे जे शेतीचे मालक आहेत ते आता दुसऱ्याचा हाताखाली नोकर म्हणून काम करत आहेत. गावे ओस पडत आहेत.
यावर सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. व पडीत शेतजमीन शेतीखाली आणणे गरजेचे आहे.