महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पात्र शेतकऱ्यांना एकाचदिवशी, एकाचवेळी खात्यावर येणार ६ हजार रुपये निधी. केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे मिळून पैसे जमा होणार. पीएम किसान सन्मान निधी ( PM Kisan Nidhi Yojana ) या योजनेचा १६ वा व नमो किसान योजनेचा २रा व ३रा हप्ता आज म्हणजेच २८ फेब्रुवारीला ११ वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
शेतकरी आज खुश असणार आहेत कारण प्रत्येकी ६ हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये निधी जमा करण्यात येणार आहे.
६ हजार कसे मिळणार ?
पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये शेतऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते. पी एम किसान चा १६ वा हप्त्यासाठी शेतकरी वाट पहात होते. पी एम किसान चा १६ वा हप्ता २ हजार रुपये व महाराष्ट्र शासनाचा नमो किसान योजना चा (namo kisan yojana) २ रा हप्ता आणि ३ रा हप्ता ४ हजार असे पात्र शेतकऱ्याला ६ हजार रुपये मिळणार आहेत.
पी एम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासाठी १९४३ कोटी रुपये निधी आला असून त्याचे वितरण खात्यात होणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्यासाठी मिळून ३८०० कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील बँक खाते आधार कार्डशी संलग्न केलेल्या ईकेवायसी पूर्ण झालेल्या व भूमी अभिलेख नोंदी पूर्ण झालेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम मिळणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आज असून यवतमाळ जिल्हातील भारी येथील कार्यक्रमात पीएम किसानचा १६ व हप्ता व नमो केसांचा दुसरा आणि तिसऱ्या हप्ताचे वितरण आज दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

हप्ते चेक कसे कराल ?
आपल्याला पी एम किसान च्या वेबसाईट https://pmkisan.gov.in या वेबसाईट वर जाऊन Know your status या ऑपशन वरती आपला रजिस्टर नो टाकून चेक करावे लागेल कि आपल्याला हप्ता १६ वा मिळणार आहे की नाही.